Our Mission | Satara Police

Satara Police

Our Mission

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य. यानुसार समाजातील भल्यांचे रक्षण करण्याबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तीची पाळेमुळे शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे. कोणतेही भय न बाळगता व कोणत्याही पक्षपाताशिवाय कायद्याचे राज्य चालविण्यासाठी, तसेच  या देशाच्या कायद्याची निःपक्षपातीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. समाजाच्या निकोप समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल व भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे आमचे ध्येय आहे.

सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे , गुन्ह्यांना प्रतिबंध व त्यांचा तपास करणे, संघटित गुन्हे व असामाजिक तत्वे यांचे विरोधात कठोर कारवाई करणे, जातीय सलोखा कायम राखणे, इत्यादी कामांसाठी सातारा पोलीस दल सदैव तत्पर राहील.

सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी देखील प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे व कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे अशी मी सर्वांना विनंती करतो.  आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण सातारा जिल्ह्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात निश्चितपणे यशस्वी होऊ याची मला खात्री आहे.

 

      श्री.समीर शेख , (भा.पो.से.)

       पोलीस अधीक्षक, सातारा.